Home नाशिक धारदार शस्त्राने वार करीत तरुणाची हत्या

धारदार शस्त्राने वार करीत तरुणाची हत्या

Breaking News | Nashik Crime: धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या (Murder).

Killing a young man by stabbing him with a sharp weapon

नाशिक: शहरात आज सोमवारी  पहाटेच्या सुमारास एक युवकाची हत्या झाली. खून झालेला युवक एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणी पोलिसांना सहा जणांवर संशय असून त्यांचा पंचवटी पोलीस शोध घेत आहे.

मिळालेली माहिती अशी की,  नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनालगर म्हाडा बिल्डिंग येथील सुलभ शौचालया परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची घटना घडली. निलेश श्रीपत उपाडे (वय २१) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

निलेशवर रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या झाली असावी. आमची कुरापत का काढतो या किरकोळ कारणावरुन त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी सहा संशयित निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी चार अल्पवयीन आहेत तर दोन सज्ञान आहे. हे संशयित रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. त्यांचा शाेध पंचवटी पोलिस करीत आहेत अशी माहिती मधुकर कट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंचवटी पोलिस स्टेशन यांनी दिली.

Web Title: Killing a young man by stabbing him with a sharp weapon

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here