अहमदनगर: नाकावर बंदुकीने गोळी मारुन मित्राची हत्या!
Breaking News | Ahmednagar: टेलर काम करणाऱ्या तरूणाची बंदुकीच्या गोळीने हत्या, दोन वर्षांनंतर आरोपीवर गुन्हा दाखल.
राहुरी : पुढारी वृत्तसेवा राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे टेलर काम करणाऱ्या तरूणाची बंदुकीच्या गोळीने हत्या करण्यात आली होती. सुमारे दोन वर्षांनंतर या घटनेतील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंजाळे येथील प्रदीप एकनाथ पागिरे हा टेलर काम करून, त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरासमोरच त्याचे दुकान असल्याने गावातील अक्षय कारभारी नवले हा प्रदीप याच्याकडे नेहमी येत होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजे दरम्यान प्रदीप हा त्याच्या दुकानात काम करत होता. त्यावेळी अक्षय नवले हा आला होता. काहीतरी कारणावरून अक्षय नवले याने प्रदीप पागिरे याच्या नाकावर बंदुकीतून गोळी मारली. ती गोळी प्रदीप याच्या मानेत जाऊन अडकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदीपला अक्षय नवले याने त्याच्या गाडीतून अहमदनगर येथील एका रुग्णालयात नेले. तेव्हा अक्षय नवले याने प्रदीप पागिरे याला रुग्णालयात दाखल करून गाडी पार्किंग करुन येतो, असे सांगून त्या ठिकाणाहून तो पसार झाला. त्यावेळी प्रदीप हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मयत झाला होता. कोणताही साक्ष पुरावा नसल्याने, तसेच मयत प्रदीप पागिरे याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, हे समजू शकले नव्हते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यात २०/२०२२ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
या दरम्यान मयत प्रदीप पागिरे याच्या नातेवाईकांना या हत्येबाबत गावातून थोडीफार माहिती मिळाली आणि त्यावरून अक्षय नवले याच्यावर संशय आला. त्यानंतर रविवारी मयत प्रदीप एकनाथ पागिरे याचा भाऊ अविनाश एकनाथ पागिरे रा. गुंजाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय कारभारी नवले रा. गुंजाळे याच्यावर कलम ३०२, शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम २५/३ प्रमाणे खून व आर्मॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा सखोल तपास केला जाणार आहे. आरोपीवर खुनाचा व शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Killing a friend by shooting a gun on the nose
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study