Home औरंगाबाद मित्राचा खून करून स्वतः च्याच मृत्यूचा बनाव, प्रेयसीसह पळाला बारामतीला

मित्राचा खून करून स्वतः च्याच मृत्यूचा बनाव, प्रेयसीसह पळाला बारामतीला

Breaking News | Murder Case: छत्रपती संभाजीनगर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राचा खून करून त्याचा चेहरा आणि इतर भाग अर्धवट जाळला आणि त्याला स्वतःचे कपडे घालून खिशात आधार कार्ड, पॅन कार्ड ठेवून आपल्या मृत्यूचा बनाव.

killed his friend and faked his own death, fled to Baramati with his girlfriend

छत्रपती संभाजीनगर: मित्राचा खून करून त्याचा चेहरा आणि इतर भाग अर्धवट जाळला आणि त्याला स्वतःचे कपडे घालून खिशात आधार कार्ड, पॅन कार्ड ठेवून आपल्या मृत्यूचा बनाव केला. नंतर प्रेयसीसह बारामतीला धूम ठोकली. या फिल्मी स्टाइल गुन्ह्याची उकल पोलिसांनी अवघ्या दोन आठवड्यांत केली. आरोपी आणि त्याच्या साथीदाराला पकडले, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सोमवारी (ता. चार) पत्रकार परिषदेत दिली. मुख्य आरोपी महेश रमेश माटे (वय २०) आणि त्याचा साथीदार किशोर रमेश बर्डे (वय २३, दोघेही रा. वझर) अशी संशयितांची नावे आहेत.

डॉ. राठोड यांनी दिलेली माहिती अशी गंगापूर परिसरातील सारंगपूर शेत शिवारात शुक्रवारी (ता. एक) सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पाहणी केली असता मृत व्यक्तीचे शरीर त्याचा चेहरा व इतर अवयव जाळून त्याची अत्यंत क्रूर हत्या करून मृतदेह शिवारात टाकल्याचे समोर आले. मृतदेहाच्या कपड्यात पाकीट आढळून आले. त्यात महेश रमेश माटे याचे पॅन कार्ड, आधार कार्ड होते. त्या आधारे महेशच्या कुटुंबीयांकडून ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आले. त्यावर त्यांनी मृतदेह महेशचा नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता हा मृतदेह अमोल शिवनाथ उघडे (वय १७, रा. कदीम शहापूर, ता. गंगापूर) याचा असल्याची माहिती समोर आली. अमोल हा ३१ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याच रात्रीपासून महेशही घरी नव्हता. त्याने त्याचा मोबाइल बंद करून तो व त्याची प्रेयसी हे मानवत (जि. परभणी) येथून बीड मार्गे बार्शीला (जि. सोलापूर) जाणार असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून बारामती येथून महेशला ताब्यात घेतले. त्याने साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. याप्रकरणी अमोलची आई सुनीता शिवनाथ उघडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.

असा केला गुन्हा आरोपी महेश व किशोर यांनी कबुली दिली, की ‘अमोलला अगोदर दारू पाजली. दारूच्या नशेत असलेल्या अमोलचा नंतर गळा आवळला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर महेशने त्याचे कपडे हे मृत अमोलला घातले. अमोलची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यासह इतर भाग जाळला. त्याच्या खिशात आपल्या ओळखपत्रासह पाकीट ठेवून पसार झाला. मुलीच्या घरच्यांनी खून केल्याचे भासवून त्यांना फसवण्याचा यामागे हेतू होता.’

Web Title: killed his friend and faked his own death, fled to Baramati with his girlfriend

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here