संगमनेर: व्यावसायीक वादातून तरुणाचे अपहरण
Sangamner Crime: लोखंडी स्क्रॅपचा ठेका घेतलेल्या दोघांमध्ये व्यवहारावरून वाद झाल्याने मुंबईच्या एका व्यापाऱ्याने संगमनेर येथील एका स्क्रॅप व्यापाऱ्याचे अपहरण (Kidnapping) केल्याची धक्कादायक घटना.
संगमनेर: साखर – कारखान्याच्या लोखंडी स्क्रॅपचा ठेका घेतलेल्या दोघांमध्ये व्यवहारावरून वाद झाल्याने मुंबईच्या एका व्यापाऱ्याने संगमनेर येथील एका स्क्रॅप व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना संगमनेरातून समोर आली आहे. संगमनेर शहरा लगत असणाऱ्या समनापुर येथील व्यापारी अश्फाक मुक्तार मलिक यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. यानुसार साबान अत्तर अली उर्फ बाबू (रा. तुर्भे, नवी मुंबई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, अश्फाक यांचा समनापुर येथे मलिक स्टील नावाने लोखंडाचा ( भंगार ) व्यवसाय आहे. तसेच अश्फाक यांचा मोठा भाऊ मोबीन मुक्तार मलिक उर्फ सज्जू यांचा भंगार स्क्रॅपचा व्यवसाय आहे. मोबीन मलिक आणि नवी मुंबई तुर्भे येथील साबान अत्तर अली उर्फ बाबू या दोघांनी संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखान्या मधील लोखंड स्क्रॅप संयुक्तपणे लिलावात उचलत होते. व त्यामधून प्राप्त होणारे उत्पन्न दोघांमध्ये वाटून घेतले जात होते. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये आर्थिक व्यवहारावरून तणाव निर्माण होऊन वाद सुरू झाला होता. दरम्यान १५ एप्रिल २०२३ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास माझ्या लहान भावाने फोन केला की, मोबीन उर्फ सज्जू याची मोटरसायकल ही समनापुर मार्केट चौफुलीवर पडलेली आहे. त्यामुळे मी व माझा छोटा भाऊ व इतर माझे दोन भाऊ असे भावाचा शोध घेत असताना आम्हास माहिती मिळाली की, मोठ्या भावाचा व्यवसाय पार्टनर साबान अत्तर अली उर्फ बाबू व माझा भाऊ मोबीन मुक्तार मलिक उर्फ सज्जू व्यवसायामुळे त्याच्यासोबत गेला की त्यास पळवून नेले याबाबत मला शंका वाटल्याने माझ्या भावाचा दिवसभर शोध घेतला. परंतू तो मिळवून आला नाही. त्यामुळे आपल्या भावाचे साबान अत्तर यानेच अपहरण केले असे फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: Kidnapping of youth over business dispute
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App