ट्रकसह चालक, क्लीनरचे अपहरण, संगमनेर येथील तिघे संशियीत
Nashik: आर्थिक देवाण-घेवाणीतून संगमनेर येथील तिघा संशयितांनी मालट्रकसह चालक आगि क्लीनरचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
नाशिक: आर्थिक देवाण-घेवाणीतून संगमनेर येथील तिघा संशयितांनी मालट्रकसह चालक आगि क्लीनरचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नाशिक साखर कारखाना भागात पडली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष खेमनर (रा. साकूर), शिवाजी कूदनर व पाराजी कुदनर (दोघंही रा. शिवंडी ता. संगमनेर) अशी संशियीत अपहरण कर्त्यांची नावे आहेत. याप्रकरणी युवराज पांडुरंग पोळ (वय ३४, रा. चिमणी बार, खडकवाडी, ता. पारनेर) यानी तक्रार दाखल केली आहे. या घटनेत योगिराज पांडुरंग पोळ व बाळासाहेब दिलीप बान्डूडे या एक बालक व क्लीनरचे अपहरण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयित व पोळ यांच्यात आर्थिक व्यवहार असून, त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. पोळ यांचा ऊस वाहतुकीचा व्यवसाय असून, ते बुधवारी (दि.२९) दि.२९) मालट्रक (एमए १२ एचडी ००१४) घेऊन नाशिक कारखाना आवारात दाखल झाले असताना ही घटना घडली. संशयितांनी चालक व क्लीनरला दनवटी करीत मालट्रकसह पळवून नेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
Web Title: Kidnapping of a truck driver, cleaner, and three suspected from Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App