अहमदनगर: सिनेस्टाईल पद्धतीने कॉलेज तरुणीचे अपहरण
Breaking news | Ahmednagar: सिनेस्टाईल पद्धतीने एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण करून तीला चारचाकी वाहनातून पळवून नेल्याची घटना.
राहुरी : कोल्हार खुर्द येथे सिनेस्टाईल पद्धतीने एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण करून तीला चारचाकी वाहनातून पळवून नेल्याची घटना १२ जून रोजी घडली.
या घटनेतील १७ वर्षे, ३ महिने २७ दिवस वय असलेली अल्पवयीन मुलगी ही १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असून ती कोल्हार परिसरात तीच्या कुटुंबासह राहते.
१२ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान पिडीत मुलगी आई सोबत गवत घेण्यासाठी गेली होती. तेव्हा मुलगी पूढे निघुन गेली व तीची आई, बहीण, भाऊ पाठीमागुन गवत घेवुन येत होते. त्याचवेळी आरोपीने पांढऱ्या रंगाची टाटा मॅझीक गाडी नंबर एम. एच. १७ ए. जी. ५०२ या गाडीमध्ये बसवून तीचे अपहरण करून पळवून नेले. पिडीत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तशी फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून प्रशांत प्रविण भोसले, रा. कोल्हार खुर्द याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून राहुरी पोलिसांकडून मुलीचा व संबंधित गाडीचा शोध सुरु आहे.
Web Title: Kidnapping of college girl in cinestyle
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study