अहमदनगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण, तरुणावर विनयभंगाचा गुन्हा
Breaking News | Ahmednagar: येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा, २० वर्षीय विवाहित महिलेच्या घरात प्रवेश करीत नको ते कृत्य करणाऱ्या तरुणाविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा.
राहुरी : तालुक्यातील कणगर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अशात इसमाविर- ोधात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. कणगर येथील १६ वर्ष व ९ महिने वय असलेली एक अल्पवयीन मुलगी दि. २१ रोजी सायंकाळी ७च्या सुमारास घरातून बाहेर पडली. ती परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. कोणीतरी त्यांच्या मुलीला पळवून नेल्याची त्यांना खात्री झाली.
तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
राहुरी : २० वर्षीय विवाहित महिलेच्या घरात प्रवेश करीत नको ते कृत्य करणाऱ्या तरुणाविरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २६ जून रोजी दुपारी २च्या सुमारास पीडित विवाहित महिला घरातील कामकाज आटोपून झोपली होती. आरोपी अविनाश विधाते (रा. ताहाराबाद, हल्ली मु. चिंचाळे, ता. राहुरी) तेथे आला. त्याने विवाहितेसमवेत लज्जा उत्पन्न होईल असे गैर कृत्य केले असता विवाहितेने आरडाओरडा केला. त्यामुळे आरोपी विधाते याने पळ काढला. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Kidnapping of a minor girl, crime of molesting a youth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study