अहमदनगर: अपहरण करून विवाहितेवर अत्याचार
Breaking News | Ahmednagar: दमबाजी करून अनेक वेळा तिच्यावर अत्याचार.
राहुरी : विवाहित महिलेशी गोड बोलून राहुरी बस स्थानकासमोरून अपहरण करण्यात आले. त्यानंतर, तिला श्रीरामपूर येथे नेऊन दमबाजी करून अनेक वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना दि. ९ ते १३ जून या दरम्यान घडली.
याबाबत माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी तिची आरोपी कार्तिक सोनवणे याच्याशी ओळख झाली. सहा महिन्यापासून दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. पतीबरोबर भांडण झाल्याने पीडित महिला काही दिवसांपूर्वी राहुरी येथील एका गावात माहेरी आली होती. दि. ९ जून रोजी महिला कामानिमित्त राहुरी शहरात आली होती. आरोपी कार्तिक याने तिला फोन करून बोलावले. व तीला गोंधवणी येथे रूमवर नेले. तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. दरम्यान, पीडित महिला हरविल्याची तक्रार राहुरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. पोलिस पथकाने तिचा शोध घेऊन राहुरी येथे आणले. महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी कार्तिक सोनवणे (रा. वडाळा महादेव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Kidnapping and assaulting a married woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study