संगमनेर: पळवून नेत युवतीवर केला अत्याचार
Breaking News | Sangamner: १९ वर्षीय युवतीला पळवून नेत तिच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाविरुद्ध व मारहाण प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा : दोन महिलांचा समावेश.
संगमनेर : १९ वर्षीय युवतीला पळवून नेत तिच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाविरुद्ध तसेच या युवतीला मारहाण करणाऱ्या सात जणांविरुद्ध मंगळवारी (दि. १५) रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना २७डिसेंबर २०२४ ते २८ मार्च २०२५ दरम्यान मध्य प्रदेशातील नागलवाडी आणि इतरही ठिकाणी घडली. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
अक्षय नानासाहेब दिघे, गणेश बनसोडे, किरण भाऊसाहेब शेवकर, स्वींद्र नानासाहेब दिघे, अमित बाळासो जगदाळे, कल्याण लक्ष्मण तावरे आणि दोन महिला (सर्व रा. तळेगाव दिघे) यांच्याविरुद्ध पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. पीडित युवती तालुक्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहे. अक्षय दिघे तिच्या घरी कामानिमित्त गेला होता, त्यावेळी त्यांच्यात ओळख झाली. ओळखीचे रूपांतरण कालांतराने मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. घरचे प्रेमसंबंध मान्य करणार नसल्याने ही युवती आणि अक्षय दिघे यांनी आळंदी (जि. पुणे) येथे जाऊन विवाह केला. त्यानंतर युवती तिच्या घरी गेली. साधारण महिनाभरानंतर अक्षय दिघे याने ११ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १० वाजता तिला संगमनेर येथून पळवून म्हसवड (जि. सातारा) येथे नेले. अक्षय दिघे याचा मित्र गणेश बनसोडे हा खोलीवर आला. त्याने दमबाजी केली.
कुटुंबातील एक महिला १९ वर्षीय युवतीला आणि अक्षय दिघे याला संगमनेर शहर पोलिस ठाण्यात घेऊन आली. युवतीच्या घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
बनसोडे आणि अक्षय याने युवतीच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिल्याने ती तिच्या कुटुंबीयांसमवेत न जाता अक्षय दिघे याच्यासोबत पुन्हा म्हसवड येथे गेली. त्यानंतर काही दिवसांनी अक्षय दिघे याने युवतीला मध्य प्रदेशातील नागलवाडी येथे नेले.
अमित जगदाळे याच्या मदतीने तेथे राहण्यासाठी खोली शोधली. तेथे युवतीला अडीच महिने डांबून ठेवले. तिच्या मनाविरुद्ध अक्षय दिघे याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असेही फिर्यादीत नमूद आहे.
Web Title: Kidnapped and abused a young woman