Home अहमदनगर अहमदनगर हादरले, जिल्ह्यात दोन गटांत वादातून गोळीबार  

अहमदनगर हादरले, जिल्ह्यात दोन गटांत वादातून गोळीबार  

Ahmednagar karjat Fighting erupted between two groups Firing 

Ahmednagar News Live | karjat | कर्जत: देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादामधून दोन गट भिडल्याने प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. देवस्थानच्या जमिनी खरेदी-विक्रीच्या कारणातून कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर वाद होऊन गोळीबार करण्यात आला आहे.

याबाबत भरत नामदेव मांडगे यांनी फिर्याद दिली आहे. कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थानमध्ये सुमारे ७५ एकर क्षेत्र आहे. कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्याकडे या जमिनीच्या वादाबाबत दावा दाखल झालेला आहे. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर संदिप छगन मांडगे,  सचिन छगन मांडगे (दोन्ही रा. रेहकुरी, ता. कर्जत) हे दोघे कामकाजासाठी आले होते. त्यावेळी दोघांत वाद झाला. संदीप मांडगे याने फिर्यादी भरत मांडगे यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाणही केली. दोघांमध्ये ही झटापट सुरू असताना संदीप मांडगे याने कंबरेचे पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. सुदैवाने यात कोणाही जखमी झाले नाही. गोळीबार केल्यानंतर संदिप मांडगे तेथून निघून गेला, असे भरत मांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गोळीबार करणारा संदीप मांडगे याला पोलिसांनी अटक केली.

Web Title: Ahmednagar karjat Fighting erupted between two groups Firing 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here