Home महाराष्ट्र कंगना रनौतच्या बॉडीगार्डला बलात्कारप्रकरणी अटक

कंगना रनौतच्या बॉडीगार्डला बलात्कारप्रकरणी अटक

Kangana Ranaut's bodyguard arrested for rape

Kangana Ranut Bodyguard Rape Case: अभिनेत्री कंगना रनौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडेला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. एका मेक अप आर्टस्टने कुमार हेगडे विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार मुंबईतील डीएननगर पोलिसांत केली होती.

मुंबई पोलिसांच्या टीमने हेगडेळा मंड्याच्या हेगडाहळ येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार महिलने बॉडीगार्ड कुमार हेगडे याच्यावर गंभीर आरोप केले आहे. कुमार याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला. कुमार आणि तक्रारदार महिला हे गेल्या वर्षी जून महिन्यात एका सिनेमाच्या शुटींगदरम्यान एकत्रित आले. त्यानंतर त्यांच्यात ओळख वाढली. कुमार हेगडेणे तिला लग्नाची विचारणा केली. लग्न करण्याचे आमिष दाखवून एकत्र रहात असताना महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले. महिलेने सुरुवातीला विरोध केला होता मात्र लग्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याने ती महिला बळी पडली. असे या महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.

Web Title: Kangana Ranaut’s bodyguard arrested for rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here