Home अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूचे प्रमाण कायमच

अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूचे प्रमाण कायमच

Ahmednagar Coronavirus patient decrease

अहमदनगर | Ahmednagar Coronavirus: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १४४० रुग्ण वाढले आहेत. रुग्ण संख्या कमी झाली असली तरी मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान आज ११४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२४ टक्के इतके आहे. आज बरे झालेल्या रुग्णांत मनपा १२६, अकोले १०४, कोपरगाव ७१, कर्जत ३१, नगर ग्रामीण ११७, श्रीरामपूर ३८, श्रीगोंदा ८७, शेवगाव १३, संगमनेर १६८, राहुरी ५९, राहता ४१, पाथर्डी ७२, पारनेर १३०, नेवासा ५७, कॅन्टोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल १, इतर जिल्हा १९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या: २,४६,१८७

सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या: ११८६३

एकूण मृत्यू: ३१७३

एकूण रुग्णसंख्या: २,६१,२२३

Web Title: Ahmednagar Coronavirus patient decrease

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here