Home अकोले कळस गावची कन्या स्वप्नांली वाकचौरे सनफ्रान्सिस्को विद्यापीठातून प्रथम श्रेणीत पदवी

कळस गावची कन्या स्वप्नांली वाकचौरे सनफ्रान्सिस्को विद्यापीठातून प्रथम श्रेणीत पदवी

Kalas Swapnali Wakchaure

अकोले | Swapnali Wakchaure: अकोले तालुक्यातील कळस गावची कन्या स्वप्नांली सुनील वाकचौरे  हिने अमेरिकेतील जगप्रसिद्ध अश्या सनफ्रान्सिस्को विद्यापीठातून  संगणकातून  एम. एस. (मास्टर ऑफ सायन्स ) ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली आहे.         

अमेरिकेतील कॅलीफोर्निया राज्यातील युनिवर्सिटी ऑफ सनफ्रान्सिस्को विद्यापीठात एम. एस. या दोन वर्षाच्या मास्टर डिग्रीचा अभ्यासक्रम तिने यशस्वीरीत्या पूर्ण केला. विद्यापीठाने आयोजित केलेल्या शानदार पदवीदान कार्यक्रमात तिला हि पदवी प्रदान केली. कळस येथील जिल्हा परिषद च्या शाळेत प्राथमिक व कळसेश्वर विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले आहे.

कळस येथील शेतकरी सुनील लक्ष्मण वाकचौरे यांची कन्या तर संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील शिवशंकर कानवडे यांची पत्नी आहे. लग्नाच्या आधी आई वडील व लग्नानंतर पती नी शिक्षणाला दिलेले प्रोत्साहना मुळे ही पदवी मिळवली आहे असे स्वप्नाली हिने सांगितले. माहेरी व सासरी शेतकरी कुटुंबातील व शैक्षणिक कोणतीही पार्श्वभूमी व सुविधा नसताना स्वप्नाली हिने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Kalas Swapnali Wakchaure first-class degree from the University of San Francisco

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here