संगमनेर: निळवंडेच्या उजव्या कालव्याला पाणी आल्याने जल्लोष
Breaking News | Sangamner: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवून जलसेतूसह उजवा कालवा ही त्यांनी पूर्ण करून ठेवला. ( right canal of Nilwande)
संगमनेर: निळवंडे धरणासह डावा आणि उजवा कालवा हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण कामातून पुर्णात्वास आले, १९९९ मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी धरण व कालव्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती दिली. असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
निमगाव खुर्द (ता. संगमनेर) येथे उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. जयश्री थोरात, ॲड. माधव कानवडे, इंद्रजित थोरात, सरपंच संदीप गोपाळे आदी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, की निळवंडे धरण व कालवे हे आमदार थोरात यांच्या अथक प्रयत्नातून पूर्ण झाले आहे. डाव्या कालव्यातून पाणी दुष्काळी भागात आले. जनतेच्या आनंदाला पारावर उरला नाही. या कालव्यानंतर उजवा-कालवा लवकरात लवकर होऊन सर्व भागाला पाणी मिळावे, याकरिता थोरात यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा राहिला आहे. १९९९ मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी धरण व कालव्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती दिली. म्हाळादेवी येथील मोठा जलसेतूसह उजवा कालवा महाविकास आघाडी सरकारच्या काळातच पूर्ण झाला होता फक्त पाणी सोडणे बाकी होते. यातही सरकारने दिरंगाई केली. मात्र आज पाणी आल्याने सर्वत्र आनंद उत्सव झाला आहे.
माधव कानवडे म्हणाले, की निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केले आहे. ज्या-ज्या वेळेस आमदार थोरात मंत्री राहिले. त्या-त्या वेळेस काम गतीने होते. मात्र भाजप सरकारच्या काळात कामाची गती मंदावली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवून जलसेतूसह उजवा कालवा ही त्यांनी पूर्ण करून ठेवला होता. फक्त पाणी सोडण्याची औपचारिकता बाकी होती. यावर काही लोक श्रेय घेऊ पाहत आहे. ज्यांनी सातत्याने विरोध केला अशी लोक आता श्रेय घेतायेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र जनता अशा लोकांना ओळखून असल्याची टीकाही त्यांनी केली.
Web Title: Jubilation due to the arrival of water in the right canal of Nilwande
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study