जितेंद्र आव्हाड यांना अटक, न्यायालयीन कोठडी, अखेर जामीन मंजूर
Jitendra Awhad Arrested: चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकाला मारहाण करणे भोवले.
ठाणे: वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ठाणे : ठाण्यातील एका मॉलमधील अटक केली. त्यांना शनिवारी चित्रपटगृहात न्यायालयात हजर केले जाईल.
‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी करणारे माजी मंत्री, आलेल्या एका प्रेक्षक दाम्पत्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मारहाणप्रकरणी आव्हाड व नेते आमदार डॉ. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना खासदार आनंद परांजपे यांच्यासह १०० जणांविरुद्ध ८ नोव्हेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. आव्हाड व परांजपे यांच्यासह अन्य नऊ अशा ११ जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करीत त्यांच्या सुटकेची मागणी केली.
जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉल मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली होती. आज दुपारी त्यांना ठाण्याच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे आव्हाड यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता.
त्यानंतर आव्हाड यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज दाखल केला. यावेळी आव्हाड यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आव्हाड यांना लावण्यात आलेली 11 कलम चुकीची आहेत. त्यातील कलम 7 तर ठाणे जिल्हयात लागत नसल्याचं वकिलांनी कोटांच्या निदर्शनास आणून दिलं.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर केला आहे. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना पोलिसांना तपास कामात सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव सिनेमाच्या विरोधात आंदोलन केलं होतं. विवियाना मॉलमध्ये हे आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलनावेळी प्रेक्षकांना मारहाण झाली होती त्यामुळे वर्तकनगर पोलिसानी आव्हाड यांना आधी ताब्यात घेऊन नंतर अटक केली होती.
Web Title: Jitendra Awad arrested, judicial custody, finally granted bail
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App