Home जालना जरांगेंचे ठरलं अन् उपोषण सुटलं, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ

जरांगेंचे ठरलं अन् उपोषण सुटलं, सरसकट आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात, मराठा आरक्षणाच्या प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार.

Jarange decided and the hunger strike ended, time till 2nd January for Maratha reservation

जालना: मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यासाठी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू असं आश्वासन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो असं जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला. सरकारच्या मंडळाला यश आले आहे.

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिलं. 

शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनावर बोलताना मनोज जरांगे यांनी आपण सकारात्म असल्याचं सांगितलं. सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल आणि सर्व गुन्हे मागे घेणार असाल तर आपण राज्य सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आजची चर्चा सकारात्मक झाल्याचं स्पष्ट झालं.

सरकारला अजून वेळ वाढवून दिला तर काही फरक पडत नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी 2 जानेवारी पर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगितलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केली होती.

मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण स्थगित मात्र आरक्षण मिळेपर्यंत घरी जाणार नाही. साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. सर्व आंदोलन बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, मात्र साखळी उपोषण सुरु ठेवा. २ जानेवारीनंतर मराठे मुंबईच्या वेशीवर धडकणार. महायुती सरकारला मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे. 

Web Title: Jarange decided and the hunger strike ended, time till 2nd January for Maratha reservation

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here