संगमनेर: ‘जलजीवन’ ची पाईप चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Sangamner News : जलजीवन मिशन योजनेच्या लाखो रुपये किमतीच्या लोखंडी पाईपची चोरी करणारी आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जेरबंद (Arrested) करण्यात यश आले आहे.
संगमनेर: संगमनेर येथील जलजीवन मिशन योजनेच्या लाखो रुपये किमतीच्या लोखंडी पाईपची चोरी करणारी आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातून शिवकुमार सरोज याच्यासह त्याच्या 12 साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशियतांकडून पाईपने भरलेले तीन ट्रक हस्तगत करण्यात आले आहेत. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे सह 20 गावांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलजीवन मिशन योजनेतून सुरू आहे. या कामासाठी आणलेले 43 लाख पाच हजार 523 रुपयांचे लोखंडी पाईप चोरीस गेले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने उत्तर प्रदेशातील गौरीयाबाद येथे सापळा रचून शिवकुमारला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चोरीचे पाईप तीन ट्रकमध्ये भरून नगर जिल्ह्यात आणले. यामध्ये 34 लाख 76 हजार 364 रुपये किमतीचे 367 लोखंडी पाईपांचा समावेश आहे. शिवकुमारला पथकाने संगमनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणातील त्याच्या 12 साथीदारांना पथकाने ताब्यात घेतले आहे.
Web Title: Jaljeevan’s pipe stealing interstate gang Arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App