धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार
Nashik crime: महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार झाल्याची घटना घडल्याची तक्रार आल्याने मोठी खळबळ.
नाशिक: नाशिकमधील निफाडमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार झाल्याची घटना घडल्याची तक्रार आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी निफाड आणि आडगाव पोलिस ठाण्यात पीडितेने सहा सात तरुणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर 5 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं असून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पीडित तरुणीवर दोन वर्षांच्या कालावधीत विविध ठिकाणी दोन जणांनी अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. यात पीडित तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली असून हा सामुहिक अत्याचार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पीडित तरुणी आणि संशयित यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार निफाड पोलिस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडल्याने या प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
काल निफाड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पीडित तरुणीने सहा सात तरुणांविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. ही घटना वेगवेगळ्या ठिकाणीची असल्याने तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. निफाड पोलिस ठाण्यातून 5 जण ताब्यात घेण्यात आले आहे. हा सामुहिक अत्याचार नसून वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेली ही घटना असल्याचं समजतंय. याबाबत आता तक्रार कशी आली याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आडगाव पोलिसांनी एकाला अटक केलीये तर चार संशयित आरोपी ताब्यात घेतलंय. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना पीडित तरुणीवर दोन वर्षांच्या कालावधीत विविध ठिकाणी 2 जणांनी अत्याचार केल्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.आडगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.
Web Title: Girl studying in college was assaulted twice at different places
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News