डेटींग अँपवरून भेटायला बोलावलं! नको त्या अवस्थेत फोटो काढले अन् ब्लॅकमेलिंग, तरुणाचे टोकाचं पाऊल
Breaking News | Pune Crime: संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी घेऊन एका 21 वर्षीय तरूणाने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना.
पिंपरी : संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी घेऊन एका 21 वर्षीय तरूणाने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना (24 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली होती. सुजल सुनील मनकर (वय वर्षे 21) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव आहे. या तरूणाने हे टोकाचं पाऊल का उचललं त्याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर सहा तरुणांनी या तरुणाला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलावलं. तिथे त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळले, मात्र, त्यानंतर ही ब्लॅकमेलिंग थांबलं नाही. मग या त्रासाला कंटाळून तरुणाने मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. तीन आठवड्यांपूर्वी 25 फेब्रुवारीला ही घटना पिंपरीत घडली. आता याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुजल सुनील मनकर (वय 21) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुजल याचे वडील सुनील बाजीराव मनकर (47, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संपर्क करून संशयित सहा जणांनी मिळून सुजल याला महेशनगर पिंपरी येथे बोलावून घेतले होते. तिथे तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सुजल याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यातील 35 हजार 500 रुपये सुजल याने संशयितांना दिले. मात्र, आणखी पैशांची मागणी करत संशयितांनी सुजल याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सुजल याने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.
या प्रकरणाचा आम्ही गांभीर्याने तपास केला, त्यावेळी असं निदर्शनास आलं की, या तरूणाने नातेवाईकांकडे आणि त्याच्या मित्रांकडे वारंवार पैशांची मागणी केली होती, जवळपास पन्नास हजार रूपयांची मागणी त्याने केलेली होती.
या कारणांचा शोध घेत असताना असं लक्षात आलं एका डेटीं अॅपवरून त्याला भेटण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. तिथे त्याचे व्हिडिओ आणि फोटो घेऊन त्याच्या माध्यमातून त्याला वारंवार धमकावलं जात होतं, या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे, या टोळीचा प्रमुख प्रणव शिंदे असल्याचं समोर आलं आहे. एकूण सहा आरोपी असल्याचे समोर आले आहे.
Web Title: Invited to meet on a dating app Taking photos in an unwanted situation and blackmailing