Home पुणे इन्स्टावरची प्रेम कहाणी ठरली जीवघेणी; तरूणीसोबत शारीरिक सबंध ठेवले अन्…,

इन्स्टावरची प्रेम कहाणी ठरली जीवघेणी; तरूणीसोबत शारीरिक सबंध ठेवले अन्…,

Pune Crime: प्रियकराने तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. त्याचे फोटो व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला मित्रासोबतही संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर.

Instawar's love story turns deadly; Had physical relations with the girl

पुणे: इन्स्टावर ओळख आणि ओळखीतून निर्माण झालेले प्रेम… प्रेमाची कहाणी पुढे सरकल्यानंतर मात्र, प्रियकराने तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. त्याचे फोटो व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला मित्रासोबतही संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात १८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी १७ वर्षे ६ महिन्याची असताना तिची ओळख आरोपीसोबत इंस्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर दोघे भेटत राहिले. त्यावर आरोपीने तिच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगून तिच्या इच्छेविरूद्ध शरीर संबंध ठेवले. याचे व्हिडिओ आणि फोटो काढले. नंतर हेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला त्याच्या मित्रासोबतही संबंध ठेवण्यास सांगितले. नकार दिल्यानंतर तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणीला जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान त्यानंतर ही दोघे वारंवार पीडितेला ब्लॅकमेल करत होते. शेवटी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे करीत आहेत.

Web Title: Instawar’s love story turns deadly; Had physical relations with the girl

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here