समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना.
सिन्नर | वावी: समृद्धी महामार्गावर अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना शनिवार सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. इनोव्हा कार क्रमांक (एमएच ०८ बीई ६००६) नागपूरकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जात होती. यावेळी समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ५४५.९ वरती मौजे मलढोण शिवारात मंबईकडे जात असणाऱ्या कंटेनरला इनोव्हाकारने जोरदार धडक दिली.
यामध्ये कारमधील चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. प्रतापराव सावंत देसाई, भाग्यवान झगडे आणि अथर्व किरण निकम अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर तिघे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी सिन्नर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कलम कायदा क्रमांक ३२४(४) व १८४ प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे करत आहेत.
Web Title: Innova car fatal accident on Samriddhi highway Three deaths
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News