Home अहमदनगर नगर जिल्ह्यात इन्फ्लूएंझा एन्ट्री, 23 वर्षीय तरुणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील पहिला बळी

नगर जिल्ह्यात इन्फ्लूएंझा एन्ट्री, 23 वर्षीय तरुणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील पहिला बळी

Ahmednagar News: वैदयकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणांचा इन्फ्लूएंझा (H3N2) या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला.

Influenza entry in Nagar district, death of 23-year-old youth

अहमदनगर:  देशात धास्ती निर्माण केलेल्या इन्फ्लूएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. नगरजवळील एका खासगी वैदयकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणांचा इन्फ्लूएंझा (H3N2) या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नगर शहरातील एका मोठया रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील हा पहिला बळी असुन देशातील तिसरा मृत्यू आहे.

दरम्यान, मंगळवारी दुपारी मृत्यू युवकाच्या रक्ताचे नमुने इन्फ्लूएंझा बाधित आले असल्याचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल मिळाला आणि नगरच्या आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली. दुसरीकडे मयत तरुणाचा कोविडचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मयत तरूण मागील आठवड्यात अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तेथून नगरला आल्यावर तो आजारी पडला होता.

नगरमधील मोठया रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करत्या वेळी त्याची प्रकृती गंभीर होती. मयत तरुण मुळचा औरंगाबादचा आहे. कोविड आणि इन्फ्लूएंझामुळे मृत्यू झाल्याने नगरच्या आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. इन्फ्लूएंझा संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. दरम्यान मयत तरूणासोबत आणि संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

पुण्यामध्ये या विषाणूमुळे बाधा झालेले 22 रुग्ण आढळल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण 19 ते 60 या वयोगटातले आहेत. याबाबत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) अहवालात ही माहिती देण्यात आली.

Web Title: Influenza entry in Nagar district, death of 23-year-old youth

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here