प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह
लालबाग पेरू कंपाऊंड परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत ५०ते ५२ वय असलेल्या महिलेचा मृतदेह (Dead Body) मिळून आला.
मुंबई: मुंबईतील लालबाग पेरू कंपाऊंड परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत बांधलेल्या अवस्थेत ५०ते ५२ वय असलेल्या महिलेचा मृतदेह मिळून आला आहे. सदर मृतदेह महिला राहत असलेल्या राहत्या घरातील कपाटात प्लास्टिक पिशवीत बांधलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती माहिती रात्री उशिरा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कपाटाच्या आतील पिशवी काढून ती उघडली, तेव्हा त्यामध्ये सुमारे ५० ते ५२ वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला.
काळाचौकी पोलीसानी मृत महिलेच्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी करीत आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. वीणा प्रकाश जैन असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी तिचा मृतदेह कपाटात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता. एवढेच नाही तर महिलेच्या शरीरावर वार करण्यात आल्याचे, तसेच हात पाय असे शरीराचे अनेक भाग कापण्यात आले होते असे कळते. रात्री उशिरा फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण करून संपूर्ण फ्लॅटचा पंचनामा करण्यात आला. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान रात्री पोलिसांकडे मिसिंग तक्रार दाखल झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला.
Web Title: Dead body of the woman was found tied in a plastic bag
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App