Home महाराष्ट्र भारताचा आघाडीचा फिरकीपटूच्या आई वडिलांना कोरोनाची लागण

भारताचा आघाडीचा फिरकीपटूच्या आई वडिलांना कोरोनाची लागण

Indian Criketer Yujvendra Chahal Father and Mother Corona positive

Indian Criketer Yujvendra Chahal: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भारताचा आघाडीचा खेळाडू फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

त्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडिलांनंतर आईची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. आईवर घरीच उपचार सुरु आहे. चहलची पत्नी धनश्री वर्माने सोशियाल मेडीयावर याची माहिती दिली आहे.

धनश्रीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सांगितले आहे की, माझे सासू-सासरे करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मी रुग्णालयात होते आणि मी तेथे खुप खराब परिस्थिती पाहिली. दोघांची प्रकृती गंभीर आहे. सासऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सासूंवर घरीच उपचार होत आहेत. मी स्वत: काळजी घेत आहे तुम्ही देखील घरीच रहा आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्या.

Web Title: Indian Criketer Yujvendra Chahal Father and Mother Corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here