Home अहमदनगर खासदार सुजय विखेंच्या विरोधकांच्या संख्येत वाढ, अडचणी वाढणार?

खासदार सुजय विखेंच्या विरोधकांच्या संख्येत वाढ, अडचणी वाढणार?

Sujay Vikhe Patil: लोकसभा निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरुवात.

Increase in the number of opponents of MP Sujay Vikhe Patil

अहमदनगर : अहमदनगर  जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील  यांच्या विरोधामध्ये कधी आमदार शंकरराव गडाख तर कधी आमदार निलेश लंके तर कधीही त्यांच्याच पक्षातील आमदार राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असते. त्यातच आणखी एका नावाची भर पडल्याचं समोर येत आहे. ते नाव म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके होय.   

सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या बॅनरवर आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके यांचे फोटो झळकायला सुरुवात झाली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विविध तालुक्यात त्यांचे बॅनर्स झळकू लागले आहेत.  त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत राणीताई लंके या उभ्या राहू शकतील अशा जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

सध्या नवरात्र सुरु असल्यामुळे अहमदनगरच्या  पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवीकडे जाणाऱ्या महिला भाविकांची संख्या मोठी आहे. या भाविकांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके यांचा फोटो असलेला बॅनर देखील पाहायला मिळाला.

त्यातच राणीताई लंके यांचे पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, राहुरी या तालुक्यांमध्ये दौरे वाढल्याचं समोर येत आहे. त्यामुळे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके या खासदार सुजय विखे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवतील अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र सध्या हे प्रतिस्पर्धी महायुतीमध्ये एकत्र आहेत तरी देखील आमदार निलेश लंके यांचे एक वक्तव्य भविष्यातील राणीताई लंके यांच्या उमेदवारीला दुजोरा देणारच ठरत आहे.

काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी एक सूचक विधान केलं होतं. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, एकाच घरात दोन वेग वेगळे मतप्रवाह असू शकतात.  दरम्यान सध्या भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट हा महायुतीत सत्तेत आहे. तरी देखील कधी निलेश लंके तर कधी राणीताई लंके यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा रंगत असते. याबाबत बोलताना स्वतः राणीताई लंके यांनी हे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले आहेत.  त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्याचा नक्कीच विचार होईल पण पक्षश्रेष्ठींचा विचार घेऊनच पुढे निर्णय घेऊ असं म्हटलं.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना देखील बाहेरच्या उमेदवारांना ऐवजी दक्षिणेकडील एखाद्या नेत्याने उमेदवारी करावी अशी अपेक्षा आहे. सुजय विखे यांच्या विरोधामध्ये कधी शंकरराव गडाख तर कधी निलेश लंके यांच्या नावाची चर्चा होत असताना खुद्द त्यांच्याच पक्षातील विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे देखील खासदारकीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जातं. पक्ष आदेशानंतर निर्णय घेऊ असं सूचक विधान ते देखील नेहमी करत असतात.

सून-मामीनं मिळून २० दिवसांत अख्खं कुटुंब संपवलं; पाच जणांची हत्या, थरारक घटना 

आमदार राम शिंदे आणि सुजय विखे यांचे फारसे सख्ख्य नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आमदार राम शिंदे हे अधून मधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं विधान करत असतात. आपल्याला कोणी बिनविरोध निवडणूक लढू देणार नाही कोणी ना कोणी समोरचा उमेदवार असणारच आहे. जनता जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य असेल असं सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे.

आमदार निलेश लंके ज्यावेळी महाविकास आघाडी मध्ये होते त्यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे आणि त्यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला.  त्यातच आता आमदार निलेश लंके हे महायुतीत असल्याने खासदार सुजय काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांनी एकाच घरात दोन मतप्रवाह असू शकतात असं सूचक विधान केल्याने खासदार सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Increase in the number of opponents of MP Sujay Vikhe Patil

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here