लिंगदेव परिसरातील आयडीया कंपनीकडुन वारंवार फसवणुक होत आहे.
लिंगदेव परिसरातील आयडीया कंपनीकडुन वारंवार फसवणुक होत आहे.
अकोले प्रतिनिधी (शुभम फाफाळे): अकोले तालुक्यातील मुळा परिसरात असणार्या लिंगदेव गावात आयडीया कंपनीकडुन अनेकदा फसवणूक होत आहे.सध्या गेली तीन दिवसांपासून लिंगदेव गावात पुर्णता नेटवर्क बंद आहे. तसेच या परिसरात विविध आयडीया कंपनीच्या विविध फसव्या स्किमांनी लिंगदेव परिसरातील ग्रामस्थांना भुरळ पाडली व परिसरातील ग्रामस्थांनी ह्या फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवत आपल्या जुन्या कंपनीची सिमकार्ड हे आयडीया कंपनीत करुन घेतली. या परिसरातील आयडीया ग्राहक हा ईंटरनेटसाठी 4G चा रिचार्ज करतो मात्र या ठिकाणी सध्या त्याच्या नशिबी 2G च नेटवर्क भेटत नाही अश्या पद्धतीने परिसरातील हजारो ग्राहकांची फसवनूक केली गेली.अनेक दिवसांपासुन हे असे चालु आहे.व यामध्ये परिसरातील सर्वसामान्य ग्रामीण नागरीक भरडला जात आहे.या प्रश्नासंदर्भात अनेकदा ग्रामस्थांनी आयडीया कंपनीच्या डिलरकडे तक्रार केली व त्या डीलरने देखील ग्रामस्थांची तक्रार आपल्या वरिष्ठांकडे पाठवली. परंतु वरिष्ठांनीही याकडे कानाडोळा केला .
आयडीया कंपनीच्या या ‘हमसफर’ भुमीकेमुळे लिंगदेव परिसरातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या परिसरात शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. आयडिया कंपनीचे सीमकार्ड हे आपल्या शेतातील पंपाच्या अॅाटोला जोडले आहे व सध्या गावात या मनमानी कंपनीला नेटवर्क नसल्यामुळे शेतकर्यांना रात्री अपरात्री आपली मोटार चालु करण्यासाठी नदीवर जावे लागत आहे.यामुळे शेतकरी वर्ग देखिल मोठ्या प्रमाणावर संतप्त आहे. तसेच गेली तीन दिवसांपासून गावातील संपर्क हा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे .यामुळे एखादी आपात्कालीन बातमी सुद्धा पोहचवने अशक्य झाले आहे.तसेच सध्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यामुळे तालुक्यात चोर्यांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.त्यामुळे परिसरात रात्री घबराटिचे वातावरण आहे. परिसरातील नागरीक मोबाईल चा वापर करुन रात्री एकमेकांशी संवाद साधत होते. मात्र आताच्या या आयडीया च्या अकार्यक्षमतेमुळे सध्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
या सर्व प्रश्नांचा आयडीया कंपनीने गांभिर्यांने विचार करुन तातडीने आपली नेटवर्क सुविधा न सुधारल्यास लिंगदेव गावतील ग्रामस्थांनी यावेळी तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
अकोले प्रतिनिधी (शुभम फाफाळे)
Website Title: IDEA company in Lingdev area is getting cheated
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi News, Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.
प्रमोटेड बातम्या:
देवगाव परिसरात तर कोणत्याच सिमकार्ड ला नेटवर्क नाहीये .साधा फोन करण्यासाठी दूरवरच्या टेकडीवर जावं लागतं . jio वाल्यानी 1 वर्ष झालं गावात टॉवर बांधून ठेवलाय पण टॉवर चालू करत नाहीत.बऱ्याच ठिकाणी jio चे फक्त टॉवर बांधून ठेवलेत एक पण चालू नाही .याबद्दल आपण हे टॉवर का चालू नाहीत हे बतमी द्वारे लोकांना सांगा.करण आमच्याकडे कोणत्याच sim ला नेटवर्क नसल्यामुळे लोक jio चा tower चालू होण्याची खूप वाट पाहत आहेत.त्यामुळे कोणी पण काहीही खोट्या अफवा सतत पसरवत असत.