प्रेमप्रकरणास नकार दिल्याने पतीच्या मित्राने केला विनयभंग
Breaking News | Nashik Crime: पतीच्या मित्रानेच विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार. (Love affairs)
नाशिक: पतीच्या मित्रानेच विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणास नकार व धमकी दिल्याने संशयिताने फोनवर शिवीगाळ केल्याने हा प्रकार पोलीसात दाखल झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अजय पगारे असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रविशंकर मार्गावरील खोडेनगर भागात राहणाऱ्या पीडितेने फिर्याद दाखल केली आहे. संशयित व तक्रारदार महिला एकमेकांचे परिचीत असून, तो पतीचा मित्र आहे. महिलेचा पती व संशयित या दोघा मित्रांमध्ये मे २०२४ मध्ये जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याने तो पीडितेच्या संपर्कात आला. महिलेचा मोबाईल नंबर घेत त्याने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
वेळोवेळी फोन व चॅटींग करून त्याने व्यवहार पूर्ण होईल तो पर्यंत माझ्या संपर्कात रहा नाही तर पतीचे हात पाय तोडील अशी धमकी त्याने महिलेस दिली होती. त्यामुळे महिला फोन उचलत होती. गेल्या ११ जून रोजी दुपारच्या सुमारास संशयिताने फोन करून तू मला आवडतेस माझ्याशी रिलेशनमध्ये रहा अशी विनवणी केली असता महिलेने त्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने महिलेस शिवीगाळ केली व आपले काॅल रेकाॅर्डिंग व्हायरल करेल अशी धमकी दिली. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक काकुळते करत आहेत.
Web Title: Husband’s friend molested him for refusing love affairs
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study