पती पत्नी हत्याकांडातील तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोघे जण पसार
राहता | Husband Wife Murder Case: राहता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील पती पत्नीच्या हत्याकांडातील उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारांनी पती पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. यामधील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोघे जण फरार आहेत.
कोऱ्हाळे येथील चांगले वस्ती येथे पती पत्नीच्या डोक्यात फावडे घालून निर्घुण हत्याप्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून हत्येची कबुली दिली आहे.
कोर्हाळे येथील चांगले वस्तीत शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशिकांत चांगले (वय 55) या दोघा पती-पत्नीच्या डोक्यात फावडे मारुन त्यांची हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी राहाता पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
Web Title: Husband Wife Murder Case