विजेचा धक्का लागून पती पत्नीचा जागीच मृत्यू
Shevgaon News: वीज प्रवाह गवत कापण्याच्या कटर मशीनमध्ये उतरल्याने पती पत्नीचा विजेचा धक्का (Electric Shock) लागून जागीच मृत्यू.
शेवगाव: शेवगाव तालुक्यात शनिवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात काम करीत असताना वीज प्रवाह गवत कापण्याच्या कटर मशीनमध्ये उतरल्याने पती पत्नीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातात जालींदर एकनाथ कांबळे (37) व निता जालींदर कांबळे (26, राहणार शेवगाव, कांबळे वस्ती) अशी मृत्यु झालेल्या पती पत्नींची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे पती-पत्नी नव्यानेच गवत काढण्यासाठी आणलेल्या कटर मशिनने कपाशी पिकातील गवत काढत होते. बांधावरुन टाकलेल्या केबल कटर मशिनच्या पात्याला गुंतून कापली गेली. यातील विजेचा प्रवाह कटरमध्ये उतरून जालींदर कांबळे यांना विजेचा धक्का लागला.
यामुळे ते जागेवर पडले. पती पडले म्हणून नीता कांबळे त्यांना पाहण्यासाठी गेल्या पतीला हात लावला असता त्यांना ही विजेचा धक्का बसल्याने दोघांचाही जागेवर मृत्यू झाला. ही घटना त्यांची चार वर्षाची मुलीने पाहिल्याने हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला. नातेवाईक व शेजारच्यांनी त्यांना त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केली. पोलिसांनी पंचनाम करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली. तरुण शेतकरी पती-पत्नी असा दुर्देवी मृत्यू झाल्याने परीसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Husband and wife died on the spot due to electric shock