बीअर न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार
Breaking News | Jalgaon Crime: गोळीबार करून दोघेही दुचाकीवरून पसार.
जळगाव | यावल – रायबाचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०, रा. पुनगाव, ता. चोपडा, ह.मु, जळगाव) यांच्यावर गुरुवारी रात्री गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसांत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
शुक्रवारी डीवायएसपी अण्णासाहेब घोलप आणि पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी धानोरा व किनगाव मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दरम्यान, जखमी हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
गुरुवारी रात्री प्रमोद बाविस्कर हे मित्र रतन रमेश वानखेडे यांच्यासोबत कारमधून किनगावकडे निघाले होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका अज्ञात तरुणाने त्यांच्याकडे बियरची मागणी केली. हॉटेल बंद असल्याचे आणि बियर हवी असल्यास किनगाव येथे जाण्याचे बाविस्कर यांनी सांगितले. यावरून चिडलेल्या त्या इसमाने पिस्तूल काढून बाविस्कर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या छातीत, तर दुसरी उजव्या खांद्याजवळ लागली. गोळीबार करून दोघेही दुचाकीवरून किनगावच्या दिशेने पसार झाले.
सातारा : महाविद्यालयीन तरुणीचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अक्षय अमृतलाला मेहता (३२, रा. आझादनगर, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अक्षयने तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर ठेवला होता.
Breaking News: Hotel owner shot for not serving beer