Home नागपूर हॉटेलच्या मॅनेजरचे भररस्त्यात अश्लील चाळे

हॉटेलच्या मॅनेजरचे भररस्त्यात अश्लील चाळे

Breaking News | Nagpur: वर्धा मार्गावरील सुशोभीकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींकडे पाहत एका आरोपीने अश्लील चाळे केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला.

Hotel manager's obscene gestures in public

नागपूर : नागपुरात वर्दळीचा मार्ग असलेल्या वर्धा मार्गावरील सुशोभीकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींकडे पाहत एका आरोपीने अश्लील चाळे केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी हा

नागपुरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. आरोपीचे नाव शांतकुमार असून, तो मूळचा कर्नाटक येथील रहिवासी आहे. मागील काही काळापासून तो वर्धा मार्गावरील ली-मेरिडिअन या हॉटेलमध्ये कार्यरत होता. सायंकाळच्या सुमारास फुटपाथवर तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक येऊन बसतात. रविवारी सायंकाळी काही

तरुणी बसल्या होत्या. अचानक शांतकुमार कारने तेथे आला व उतरून पायी चालू लागला. तेथे बसलेल्या तरुणींसमोर तो आला व त्याने अश्लील चाळे सुरू केले. या प्रकारामुळे तरुणींना धक्काच बसला. काही तरुणींनी दुर्लक्ष केले. मात्र, एकीने हिंमत दाखवत त्याचा व्हिडीओ काढला व पोलिसांना फोन लावण्याबाबत इतरांना म्हटले. ते ऐकून आरोपी तेथून फरार झाला होता.

Web Title: Hotel manager’s obscene gestures in public

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here