Home नाशिक लॉजमध्ये हॉटेल मॅनेजरने तरुणीवर केला बलात्कार

लॉजमध्ये हॉटेल मॅनेजरने तरुणीवर केला बलात्कार

Breaking News | Nashik Crime: नाशिकमधील मॅजेस्टिक, सेलिब्रेशन हॉटेलसह पुण्यातील अगस्त लॉज, हॉटेलसह विविध ठिकाणी वारंवार बलात्कार (Raped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

hotel manager raped the girl in the lodge

नाशिक: हॉटेल मॅनेजरने लग्नाचे अमिष दाखवून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत नाशिकमधील मॅजेस्टिक, सेलिब्रेशन हॉटेलसह पुण्यातील अगस्त लॉज, हॉटेलसह विविध ठिकाणी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी भागिनाथ भास्कर लोखंडे (रा. कन्नड, छत्रपती संभाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी भागिनाथ लोखंडे व पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संशयित अंबडमधील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होता. पीडित तरुणीही एका हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करायची. संशयित लोखंडे याने तरुणीशी ओळख वाढवली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. संशयिताने तिचा विश्वास संपादन केला. ही संधी साधत त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिने होकार देताच त्याने तिच्यावर लेखानगर, अंबडमधील हॉटेल मॅजेस्टिक, पाथर्डी फाटा परिसरातील सेलिब्रेशन हॉटेलमध्ये बलात्कार केला. तरुणी लग्नाबाबत विचारणा करू लागल्याने त्याने तिला पुण्यात जाऊन कोर्ट मॅरेज करू, असे सांगितले. त्याने दुचाकीवरुन तिला २० ऑक्टोबर रोजी पुण्यात आणले. मात्र, तिच्याशी लग्न केले नाही. लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्यावर पुणे जिल्ह्यातील दिवे गावातील अगत्य लॉज, भांडगाव, सासवड येथेही वारंवार बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगू नको, असाही दम त्याने तिला दिला.

पीडित तरुणीला संशयित लोखंडे याचे पहिले लग्न झाले असून, मुलेही असल्याचे समजले. हे ऐकून तिला धक्काच बसला. त्यातून तिला त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आले. तिने आपबित तात्काळ तिच्या आई व मामाला कॉल करून सांगत पुण्यात बोलवून घेतले. त्यानंतर ती पुण्यातून नाशिकमध्ये आली. याप्रकरणी तिने संशयित भागिनाथ लोखंडेविरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहेत.

Web Title: hotel manager raped the girl in the lodge

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here