संगमनेर: हॉटेल ‘सेलिब्रेशन’ प्रकरण, तरुणीने केला गुन्हा दाखल
Sangamner Crime: अश्लील आणि शाब्दिक शेरेबाजी झाल्याचा आरोप संबंधित तरुणीने तक्रारीत दाखल, चार जणांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल.
संगमनेर: शहरातील अकोले रस्त्यावरील हॉटेल ‘सेलिब्रेशन’ मध्ये झालेली हाणामारी माजी नगरसेवक नितीन अभंग व त्यांच्या कुटुंबियांना चांगलीच महागात पडली. एका तरुणीने तक्रार केल्याने नितीन अभंग यांच्यासह 4 जणांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. अश्लील आणि शाब्दिक शेरेबाजी झाल्याचा आरोप संबंधित तरुणीने तक्रारीत दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मागील आठवड्यात रात्री 11 वाजेच्या सुमारास हॉटेल सेलिब्रेशनमध्ये वेळ संपल्याचे कारण देत एका 30 वर्षीय तरुणीला जेवण नाकारण्यात आले होते. तत्पूर्वी संबंधित तरुणी बराचवेळ त्या हॉटेलमध्ये बसून असल्याने हॉटेलच्या कर्मचार्यांनी तिला ऑर्डर देण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यातून अश्लील आणि शाब्दिक शेरेबाजी झाल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला होता. या दरम्यान पीडितेसोबत आलेल्या चौघा तरुणांनी हॉटेल मालकासह तेथील कर्मचार्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली.
याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 509 प्रमाणे गुन्हाही दाखल केला होता. तर हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून तोडफोड व मारहाण करण्यासह या गदारोळात दीड तोळे वजनाची सोनसाखळी व रोकड लांबविल्याचा आरोप केल्याने योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे व दीपक रणसुरे या चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या पीडित तरुणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ एक दिवसाचे आंदोलनही केले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना पीडितेने त्या दिवशीचा घटनाक्रम सांगत आपल्यासोबत अश्लिल भाषेत जातीवाचक प्रकार घडल्याचे मात्र पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला.
यानंतर पीडितेने सोमवारी दि. 9 रोजी हॉटेल सेलिब्रेशनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार लिखित स्वरुपात कथन करीत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना पाठवला व त्याच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक व अप्पर अधिक्षकांनाही पाठविल्या होत्या. त्याची दखल घेत उपअधीक्षक वाघचौरे यांनी मंगळवारी पीडित तरुणीचा पुरवणी जवाब नोंदवून घेतला असून त्यावरून पप्पू अभंग, माजी नगरसेवक नितीन अभंग त्यांचे बंधू प्रवीण व अंकुश अभंग यांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 354, 354 (अ), 143, 147, 148, 149, 323 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील अॅट्रोसिटी तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Hotel ‘Celebration’ case, young woman filed a Crime
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App