पैशाने इतिहास लिहिला जात नाही तर तो त्यागाने लिहिला जातो: डॉ.संजय गोर्डे
Rajur News: गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे कला मंडळाचे उद्घाटन.
राजूर: पैशाने इतिहास लिहिला जात नाही तर तो त्यागाने लिहिला जातो, त्यागाशिवाय संस्कृती नाही. त्यासाठी कला पाहीजे. म्हणूनच शिक्षण घेताना ज्ञानाबरोबर कलेची संगत घरा असे प्रतिपादन डॉ. संजय गोर्डे यांनी केले. सत्यनिकेतन संस्थे गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. गोर्डे विचारमंचावरून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विदयालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य अन्नासाहेब धतुरे, कलाविभाग प्रमुख शरद तुपविहीरे, बाळासाहेब घिगे, बिना सावंत यांसह दिपक बुहाडे, संतोष कोटकर, रमेश रोडगे, रविद्र मढवई, संतराम बारवकर, अजित गुंजाळ, सुरेश शेटे, अमोल तळेकर, विकास जोरकर, सचिन लगड, सुधिर आहेर, रविंद्र कवडे, सागर चासकर, स्मिता हासे, मधुमंजिरी पवार, आरति खाडे, मंगळा देशमुख आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
व्याख्याते डॉ. गोर्डे यांनी पुढे मार्गदर्शन करताना एकूण कला ६५ आहेत. त्यामुळे जिवन कळाले पाहीजे. आवडीचे मिळत नाही, जे मिळाले ते आवडून घेतले पाहीजे. ति एक कला आहे. जगण्यासाठी अन्न लागते, का जगायचे आहे. यासाठी कला लागते. शिक्षण मेंदुसाठी आवश्यक आहे तर कला मनासाठी आवश्यक शाहू, फुले, आंबेडकर, शिवरायांचा महाराष्ट्र म्हणूनच कसं वागायच कसं जगायच काय शिकायच यावर संस्कृती टिकते. शिक्षणाने, शरीर, मन बळकट झाले पाहीजे. आहाराकडे लक्ष दया. जे खायचे ते खा, जे पाहीजे तेच पहा, जे करायचे तेच करा तरच जिवनाचा उद्धार होईल. हे समजून घेण्यासाठी कला महत्वाची असे विचार त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी विचार व्यक्त करताना कोटी रूपयाचे शरीर दिले आहे. योग्य वेळी संधीचे सोने करा असे मत व्यक्त केले.
उपप्राचार्य श्री. धतुरे यांनी मार्गदर्शन करताना कला ओळखा छंद जोपासते जिवन जगायला मदत करतील. आत्मविश्वास ठेवा. यातुनच कलाकार जन्माला येतात असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद तुपविहिरे यांनी केले. सुत्रसंचलन बिना सावंत यांनी केले तर बाळासाहेब घिगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Web Title: History is not written by money but by sacrifice Dr.Sanjay Gorde
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App