विवाहित महिलेचा चाकूचे सपासप वार करुन निर्घृण खून
Pune Crime News: चाकूने महिलेवर सपासप वार करत तिला ठार केलं.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चाकूने सपासप वार करुन 33 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे. सुनिता दादाराव शेंडे असं खून झालेल्या महिलेचे नाव असून ती इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी मधील शेंडेवस्ती येथील रहिवासी आहे. या खुनामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पहाटेच्या सुमारास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल (बुधवारी दि.04 डिसेंबर) रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रोडवर घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, 33 वर्षीय विवाहित महिलेचा चाकूचे वार करुन निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. ही घटना निमगाव केतकी मध्ये बुधवारी (ता. ४) रात्री घडली आहे. संशयित आरोपीस पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. सुनिता दादाराव शेंडे (वय 33 वर्षे रा.शेंडेवस्ती ता. इंदापूर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ज्ञानेश्वर बबन रासकर (रा.सुरवड, ता.इंदापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मयत विवाहितेचा पती दादाराव निवृत्ती शेंडे (वय 37 वर्षे, रा.शेंडेवस्ती, निमगाव केतकी, ता.इंदापूर) याने या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.
या घटनेप्रकरणी इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी माहिती देताना सांगितले, ‘ काल (बुधवारी) रात्री सव्वाआठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी गावच्या हद्दीत सराफवाडी रस्त्याच्या डाव्या बाजुला असणाऱ्या अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडजवळ अज्ञात कारणामुळे आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने सुनीता शेंडे या महिलेवर सपासप वार करत तिला ठार केलं. या प्रकरणी दादासाहेब शेंडे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या अनुषंगाने तातडीने तपास करत पोलीसांनी आरोपीस तातडीने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे पुढील तपास करत आहे.
Web Title: Heinous murder of a married woman by stabbing her with a knife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study