Home अकोले Bhandardara Dam: भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Bhandardara Dam: भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Bhandardara Dam: Rain Increased, मान्सून पुन्हा सक्रीय.

Heavy rainfall increased in Bhandardara Dam area

भंडारदरा: भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. डोंगरदऱ्यांवरील धबधबे पुन्हा सक्रीय झाले आहे.

गेल्या बारा तासांत धरणात 133 दलघफू पाणी नव्याने आल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा सायंकाळी 9509 दलघफू (86.14टक्के) झाला होता. दिवसभर भंडारदरात पाऊस सुरू होता. या पावसाची नोंद 21 मिमी झाली आहे. रात्री भंडारदरात पावसाचा जोर वाढला होता.

मंगळवारी दुपारनंतर पाणलोटात पावसाने काहीसा जोर पकडला होता. त्यामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक वाढली आहे. निळवंडे धरणातही पाण्याची चांगली आवक होत आहे. सायंकाळी 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 7408 दलघफू झाला होता. मुळा पाणलोटात पावसाचा जोर टिकून असल्याने मुळा नदीतील विसर्ग काल मंगळवारी सकाळी 1873 क्युसेकपर्यंत होता. तो सायंकाळी 2984 क्युसेक झाला होता.धरणात आवक वाढल्याने मुळा धरणातील पाणीसाठा 20921 दलघफू (80.46 टक्के) झाला होता.

अकोले तालुक्यातील कोतुळ, बोरी, भोळेवाडी या तीन गावांना शेती आणि पिण्याचे पाण्याची तहान भागविणारा बोरी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला. हा तलाव भरल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे

धरणसाठे –

भंडारदरा- 9509 दलघफू | विसर्ग 830 क्युसेक

निळवंडे – 7379 दलघफू | विसर्ग 690 क्युसेक

मुळा- 20820 दलघफू | आवक 1873 क्युसेक

साठा (टक्के)

येडगाव 50.84

माणिकडोह 59.13

वडज 91.51

डिंभे 83.48

घोड 87.37

पाऊस-(मिमी)

भंडारदरा- 15

घाटघर- 58

रतनवाडी- 16

वाकी- 09

Web Title: Heavy rainfall increased in Bhandardara Dam area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here