Home अकोले भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढला, विसर्ग वाढला, सतर्कतेचा इशारा

भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढला, विसर्ग वाढला, सतर्कतेचा इशारा

Bhandardara Dam: भंडारदरा धरणातील पाणीसाठा ८९.१७ टक्के झाला आहे. 

Heavy rainfall increased in the Bhandardara catchment area

भंडारदरा: मागील तीन दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर पाउस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक वाढली आहे.

काल सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा 9844 दलघफू (89.17) टक्के झाला होता. तर धरणातून 3609 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 49 मिमी झाली आहे.

भंडारदरातून पाणी सोडण्यात येत असल्याने निळवंडेतील पाणीसाठा वाढत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 6773 दलघफू (81.40 टक्के) होता. या धरणातून प्रवरा नदीत 3305 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटात पाऊस वाढल्याने हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, मुळा पाणलोटातही पावसाने पुन्हा काहीसा जोर पकडल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढला आहे. काल सकाळी कोतूळ येथील 4429 क्युसेक असलेला विसर्ग सायंकाळी 5638 क्युसेक झाला होता. रात्रीतून त्यात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. धरणातील साठा 18139 दलघफू (69.76 टक्के) झाल आहे. आज हा साठा 70 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे.

Web Title: Heavy rainfall increased in the Bhandardara catchment area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here