अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाउस, ओढे , नाल्यांना पुर
Heavy Rain: तालुक्यातील वडझिरे, देवी भोयरे, लोणी मावळा या परिसरात शनिवारी सायंकाळी ढगफुटी सद्रस्य पाऊस (Parner Taluka).
पारनेर: पारनेर तालुक्यातील वडझिरे, देवी भोयरे, लोणी मावळा या परिसरात शनिवारी सायंकाळी ढगफुटी सद्रस्य पाऊस झाला. यामुळे एकाच पावसात परिसरातील ओढे , नाल्यांना पुर आला असुन यात शेत माला सह पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .
मागील महिनाभरापासुन ओढ असलेल्या पावसाची संपुर्ण राज्यासह पारनेर कराना मोठी प्रतिक्षा लागली होती. अनेक हवामान तज्ञ व हवामान संस्थानी शनिवार पासुन पाऊस सागितला होता. मात्र पारनेर तालुक्यात शनिवारी सकाळपासुनच हवामानात उकाडा होता. वार्याची दिशा बदलली होती व आकाशात ढग जमा होताना दिसत होते. दुपारी बारा एक वाजण्यच्या सुमारास तालुक्यात अनेक भागात हलक्या प्रमाणात पाऊस पडण्यास सुरवात झाली. दुपार नंतर काही ठिकाणी पावसाचा वेग वाढला होता.
तालुक्यातील वडझिरे, दिवी भोयरे पारनेर साखर कारखाना परिसर, लोणी मावळा या भागात शनिवारी दुपार नंतर आचानक जोरदार पावसास सुरवात झाली व बघता बघता पावसाने रुद्र रुप धारण केले व काही कळायच्या आत परिसरात पाणीच पाणी झाले. पारनेर तालुक्यात आषाढ महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडतो हा इतिहास आहे. परंतु शनिवारी पावासाने या भागात इतके आक्राळ विक्राळ रुप धारण केले की काही वेळात शेते जलमय झाली. तर ओढे, नदी, नालेना पुर आला. पहिल्याच पावासातना तळे तुडूब भरले. अचानक असा पाऊस आल्याने नागरिकही भांबावून गेले. अनेक ठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले. काही उभी पिके सपाट झाली. अनेक ठिकाणी शेतकर्यांचा कांदा भिजल्याची प्राथमिक माहिती आहे .
ऐन पावसाळ्यात पावसाची दोन तीन नक्षत्र कोरडी गेली होती. मुग पिक पेरणी अभावी जवळजवळ गेल्यात जमा आसताना शेतकर्यांना पावसाची मोठी प्रतिक्षा होती. अशात शनिवारी दुपारी अचानक ऐवढा मोठा पाऊस तोही पहिलाच पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग चक्रावुन गेला होता.पहिल्याच पावसात ओढे नाले भरुन वाहू लागल्याने शेतकरी अचंबीत झाले आहेत. या ढग फुटी सदृश्य पावसाने नागरिकांची त्रेधा- त्रिपट उडाली असली तरी शेतकर्यांना या पावसाची प्रतिक्षा होती. त्यामुळे थोडे फार नुकसान झाले तरी मोठा पाऊस झाला म्हणून शेतकरी आनंदी दिसत होते.
Web Title: Heavy rain like cloudbursts, rivers, and streams are flooded
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App