शिर्डीत ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसाचे पाणी घरांनी, नागरिकांची उडाली दाणादाण
Shirdi Heavy Rain: पावसाचे पाणी घरांनी घुसल्याने लक्ष्मीनगरमधील दिडशे कुटुंब रस्त्यावर.
शिर्डी: शिर्डी सह परिसरात ढगफुटीसदृश्य पाउस झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी घरांनी घुसल्याने लक्ष्मीनगरमधील दिडशे कुटुंब रस्त्यावर आली आहेत. पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली आहे.
तर नगर मनमाड महामार्गावर पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
श्रावण महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर बुधवार (दि.३१) रोजी रात्री शिर्डी शहरात विजेच्या कडकडाटात पावसाने जोरदार सुरुवात केली होती. सतत चार पाच तास सुरू असलेल्या पावसाने शिर्डीत दाणादाण करून टाकली आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे.
नगर मनमाड महामार्गावर कंबरेएवढे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. तर शहरातील पश्चिम बाजूस असलेल्या उपनगरात नेहमीप्रमाणे लेंडी नाल्याचे पाणी आल्याने पुनमनगर, साईनाथ रुग्णालय, सितानगर, हेडगेवार नगर, लक्ष्मीनगर याठिकाणच्या रहिवाशांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
तसेच निमगाव हद्दीतील श्री साईबाबा महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थीनींना मोठी कसरत करावी लागली. त्याबरोबरच नव्याने बांधण्यात आलेल्या पोलिस ठाण्यात देखील पाणी साचल्याने अनेकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शासकीय विश्रामगृह देखील पाण्यात आहे.
Web Title: Heavy Rain Cloudburst-like rain in Shirdi