Home पुणे गोडाऊनला भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट, तीन जणांचा मृत्यू

गोडाऊनला भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट, तीन जणांचा मृत्यू

पुणे शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. .“शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग (Fire) , आगीत तीन जणांचा मृत्यू.

Heavy fire at godown, explosion of four cylinders, death of three

पुणे : पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु या आगीमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली, हे कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील वाघोलीत शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आग लागली. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत ४ सिलेंडर फुटले आहेत. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले.

या भीषण आगीत दुर्देवाने तीन कामगारांचे मृतदेह आढळले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

Web Title: Heavy fire at godown, explosion of four cylinders, death of three

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here