Home पुणे उच्चशिक्षित तृतीयपंथीयाचा झाला प्रेमभंग; बॉयफ्रेंडच्या घरी जात उचललं धक्कादायक पाऊल

उच्चशिक्षित तृतीयपंथीयाचा झाला प्रेमभंग; बॉयफ्रेंडच्या घरी जात उचललं धक्कादायक पाऊल

Pune Suicide l एका तृतीयपंथीयाने प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर.

heartbreaking case of a third party committing suicide due to love affair

पुणे:  पुण्यातील एका तृतीयपंथीयाने प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विष प्राशन करून त्यांनी आपले जीवन संपवले. रुपा देवी माहेश्वरी  (पूर्वाश्रमीचे नाव सारंग पुणेकर) असे त्यांचे नाव असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होत्या.

रुपा माहेश्वरी या पुण्यात सामाजिक कार्यकर्त्या  म्हणून कार्यरत होत्या. त्या उच्चशिक्षित आणि कवयित्री देखील होत्या. पुण्यात त्यांनी अनेक आंदोलने आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. शहरातील महत्त्वाच्या आंदोलनांमध्ये त्या अग्रभागी असत. नितेश राणे यांनी तृतीयपंथीयांसाठी “हिजडा” या आक्षेपार्ह शब्दाचा प्रयोग केल्यानंतर बंड गार्डन पोलीस स्टेशनसमोर रस्ता रोको करत त्यांनी केलेले आंदोलन विशेष गाजले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर येथील एका तरुणासोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये परस्पर संमतीने प्रेमसंबंध सुरू होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी रुपा नेहमी जयपूरला जात असत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांची भेट झाली नव्हती. रुपा यांच्या प्रियकराचे वागणे बदलल्याची त्यांची तक्रार होती.

आपला मुलगा एका तृतीयपंथीयाच्या प्रेमात असल्याचे समजल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुपा यांच्याशी बोलण्यास मनाई केली. तेव्हापासून त्यांचा प्रियकर रुपा यांच्याशी बोलत नव्हता. हा विरह सहन न झाल्याने १३ जानेवारीला रुपा जयपूरला पोहोचल्या. तिथे त्यांनी आपल्या प्रियकराच्या घरासमोर जाऊन त्याला हाका मारल्या. अनेक तास वाट पाहूनही तो बाहेर आला नाही.

याच नैराश्यातून रुपा यांनी आपल्या प्रियकराच्या घरापासून काही अंतरावर कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. रुपा यांचा मृतदेह प्रियकराच्या घरापासून जवळच्या परिसरात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ ही सुसाईड नोट आणि कीटकनाशकाची रिकामी बाटली सापडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Web Title: heartbreaking case of a third party committing suicide due to love affair

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here