Home लाइफस्टाइल Health tips in Marathi: निरोगी जीवन जगण्यासाठी काही टिप्स

Health tips in Marathi: निरोगी जीवन जगण्यासाठी काही टिप्स

Health tips in Marathi: निरोगी जीवन जगण्यासाठी काही टिप्स

आपण आयुष्यात नेहमीच धावपळ करीत असतो. या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे आपण दुर्लक्षित करतो. यासाठी काहीजण जिम जॉईन करतात मात्र जिमला जाऊन मेहनत करावी लागत असल्याने जिमला जाण्याचा कंटाळा करतो. पण आपण जिमला न जाता काही गोष्टींचे पालन केल्यास आपण आपले आरोग्य निरोगी ठेऊ शकतो. आपण काही छोट्या मोठ्या गोष्टींचे पालन करून आपले आरोग्य निरोगी ठेऊ शकतो.

  • रोज सकाळी किमान २० मिनिटे मोकळ्या हवेत चालायला हवे की ज्यामुळे आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. आपल्याला काम करण्यास स्पुर्ती येते. दिवसही चांगला जातो.
  • रोज सकाळी भरपूर नाश्ता करणे शरीरास आरोग्यदायी असते. त्याचबरोबर नाश्त्यामध्ये फळांचा समावेश केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते. रोज दोन केली खाल्ल्यास अति उत्तम.
  • कामावर असताना लिप्टचा वापर टाळावा. जिन्याने चढ उतार करावा. यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
  • रात्री जेवण करताना आठ वाजेच्या अगोदर शक्यतो जेवण घ्यावे. जेवण कमी असावे. गोड पदार्थ रात्रीच्या जेवणात शक्यतो टाळावेत. याचा देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • आपण धावपळीच्या जेवनात फास्ट फूड खात असतो. किंवा काहीना फास्ट फूड खाण्याची इच्छा होते. फास्ट फूड खाणे शक्यतो टाळावेत.
  • आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीराची खोबरे तेलाने मालिश करावी. मालिश केल्यास मांसपेशी मजबूत होत असतात. मालिश केल्याने आपणास अनेक फायदे होऊ शकतात.
  • दिवसभरात आपण पाच मिनिटांसाठी ध्यान करायला हवे त्यामुळे आपला ताण कमी होऊन शांती लाभते.
  • आपल्या जेवणात नेहमी कच्च्या भाजीपालांचा व फळांचा समावेश करावा. उकडलेल्या डाळींचाही समावेश असावा.
  • आयुष्य निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे व रात्री लवकर झोपावे.
  • सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्यावे. दिवसभरत जास्तीत जास्त पाणी प्यावे. दिवसभरात किमान पाच ते सहा लिटर पाणी प्यावे. पाणी जास्त पिल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
  • मोबाईलचा आपण वापर करीत असतो. रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेऊ नये. जेवताना शक्यतो टी.व्ही. पाहण्याचे टाळावे. अन्नाचा घास हा जास्तीत जास्त वेळ चावून खाल्याने ते आरोग्यास हितकारक असते.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

See:  Download app Sangamner Akole News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Website Title: Health tips in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here