Home नांदेड गुरुजी तुम्हीसुध्दा ! मुख्याध्यापकाला लाच घेताना पकडले

गुरुजी तुम्हीसुध्दा ! मुख्याध्यापकाला लाच घेताना पकडले

Breaking News | Nanded Bribe Case: बिल काढण्यासाठी हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकावर कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा.

Headmaster caught taking bribe

नांदेड : जुलै महिन्याचे पगाराचे बिल काढण्यासाठी हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकावर कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार हे प्राथमिक आश्रम शाळा गांधीनगर ता. कंधार येथे वसतीगृह अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे जुलै २०२४ या महिन्याचे पगाराचे बिल प्रलंबित होते. त्याबाबत त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक संभाजी रामजी कांगणे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी कांगणे यांनी पगारीचे बिल काढण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत वसतीगृह अधीक्षकांनी लाच-लुचपत विभागाकडे २४ जुलै रोजी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरुन १ ऑगस्ट रोजी लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीची पडताळणी केली. त्यात मुख्याध्यापक संभाजी कांगणे यांनी ५ हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणात प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे याच्या विरोधात कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

Web Title: Headmaster caught taking bribe

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here