बहिणीला सोडायला गेला अन् परतलाच नाही, ती भेट ठरली अखेरची
Breaking News | Buldhana Accident: भीषण अपघातात १८ वर्षीय भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना.
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शिरला नेमानेजवळ आपल्या विवाहित बहिणीला सासरी सोडून परतणाऱ्या युवकाच्या दुचाकीला चार चाकी वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात १८ वर्षीय भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
अरकार्नुद्दीन शेख मुस्तकीम (वय वर्ष १८, राहणार देऊळघाट जिल्हा बुलढाणा) हा युवक सोमवारी त्याच्या बहिणीला तिची सासुरवाडी देऊळगाव साखरशा येथे दुचाकीने सोडायला गेला होता. दूचाकीवरुन परत येत असताना शिरला नेमाने गावाजवळ एका भरधाव चारचाकी गाडीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात अरकार्नुद्दीन हा गंभीर जखमी झाला होता.
अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोघात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच नोव्हेंबर रोजी सकाळी खामगाव सामान्य रुग्णालयात त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर देऊळगाव घाट येथे दफन विधी करण्यात आला.
Web Title: Accident He went to leave his sister and never came back
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study