Home Suicide News ४० हजार वीज बिल आल्याने त्याने स्वतःलाच पेटवून घेतले

४० हजार वीज बिल आल्याने त्याने स्वतःलाच पेटवून घेतले

He set himself on fire due to electricity bill

नागपूर: लीलाधर लक्ष्मण गायधने वय ५६ याला ४० हजार रुपयांचे बिल आल्याने वीज विभागाकडून वीज बिल कमी करून देण्याऐवजी त्याला मानसिक त्रास मिळत होता. याच मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत लीलाधर लक्ष्मण गायधने हा यशोधरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहुणे ले आउट मध्ये राहत होता.

गायधने यांचे स्वतः चे घर आहे. ते खासगी काम करायचे. मागील काही दिवसांत त्यांना ४० हजार रुपयांचे वीज बिल आले होते. एवढे बिल आल्याने त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे बिल कमी करण्यासाठी हेलपाटे मारत विनंत्या केल्या. मात्र त्यांना तेथे दिलासा मिळाला नाही. उलट त्यांना वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी मिळाली त्यामुळे गायधने हे तणावात आल्याने शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या अंगावर रॉकेल टाकत पेटवून घेतले. हे पाहून कुटुंबीयांनी धाव घेत गंभीर गायधने यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी काही वेळातच त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: He set himself on fire due to electricity bill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here