अहमदनगर: गरोदर पत्नीचा खून करून मृतदेह तलावात फेकणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी
Breaking News | Ahmednagar: पत्नीच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार केले. तिचा मृतदेह तलावात दगड बांधून फेकून दिल्याची घटना.
नगर : गरोदर पत्नीचा खून केल्याच्या गुन्ह्यात आरोपीला दोषी धरीत न्यालयाने दहा वर्ष सक्तमजुरी व पंधरा हजारांच्या दंडाची शिक्षा केली. पोपट ऊर्फ नाना मारुती जाधव (वय ३७, रा. ठाकरवाडी, ता. राहुरी, जि. नगर) असे आरोपीचे नाव आहे.
मयत नंदा हिचा २०१५ मध्ये आर- ोपी पोपट जाधव यांच्याशी विवाह झाला होता. खुनाच्या घटनेआधी सहा महिन्यांपासून ढवळपुरी येथे शेती वाट्याने करून उपजीविका भागवित होते. २०१५ मध्ये विवाह होऊन त्यांना मुलबाळ नव्हते. २०२१ मध्ये पत्नी नंदा गर्भवती राहिली. पत्नी गर्भवती झाल्यापासून पती पोपट जाधव तिच्या चारित्र्यवर संशय घेत होता. तिला मारहाणही करीत होतो. २९ मार्च २०२१ रोजी त्याने पत्नीच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार केले. तिचा मृतदेह तलावात दगड बांधून फेकून दिला. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी ए. बरालिया यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता केदार केसकर यांनी बाजू मांडली.
Web Title: Hard labor for the accused who killed his pregnant wife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study