अंत्यसंस्कारला जात असताना तरुण अचानक तिरडीवर उठून बसला
Akola News: धक्कादायक व विचित्र प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कारला (funeral) जात असताना तरुण चक्क उठून बसला, घटनेने परिसरात खळबळ.
अकोला: अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात एक विचित्र व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक तरुण मयत झाला म्हणून त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला घेऊन जात असतानाच तो चक्क तिरडीवरून उठून बसल्याची घटना घडली आहे.
प्रशांत मेसरे असं मयत झालेल्या आणि मध्येच तिरडीवर उठणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत झाला असे सांगत त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी करून त्याला स्मशानभूमीत नेत असताना तरुणामध्ये हालचाल जाणवली अंत्यसंस्कार यात्रा थांबवतच हा तरुण उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
दरम्यान हा प्रकार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान पोलिसानी त्या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर त्या तरुणावर काळी जादू केल्याचे कुटुंबानी दावा केला आहे.
दरम्यान, प्रशांतचा मृत्यू झाला म्हणून त्याच्या मित्रांनी मिस यू प्रशांत असे स्टेटस देखील ठेवले होते. या सर्व विचित्र घटनेमुळे मात्र, नागरिकांना सिनेमामधील थरारक दृश्याची आठवण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Web Title: going to the funeral, the young man suddenly sat up on a stool
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App