शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीवर अत्याचार, शिक्षकच बनला नराधम
Breaking News | Pune Crime: शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीवर क्लासच्या शिक्षकाकडून अत्याचार (abused)
पुणे: पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निरा (ता. पुरंदर) येथील एका कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीला नापास करण्याची भीती दाखवून तिचा विनयभंग करीत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका शिक्षकास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने जेजुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सुनील विश्वनाथ चव्हाण (वय 28, मूळ रा. खोजेवाडी, आपसिंगी, ता. जि. सातारा, सध्या रा. निरा) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चव्हाण हा निरा (ता. पुरंदर) येथे एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करीत आहे. तेथे पीडित मुलगी शिकवणीसाठी जात होती.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
शिक्षकाने 1 मे 2023 रोजी दुपारी एक वाजेनंतर तसेच पुन्हा आठ दिवसांनी कोचिंग क्लासच्या आतील रूममध्ये पीडितेला नापास करण्याची भीती दाखवून तिचा विनयभंग करीत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबतची फिर्याद दाखल होताच जेजुरी पोलिसांनी या शिक्षकावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: girl who was going to study was abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study