Home अमरावती रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार, धक्कादायक घटना

रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या मुलीवर सामूहिक अत्याचार, धक्कादायक घटना

Amravati Crime: 25 वर्षीय युवतीवर  जणांकडून सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. (Gang Rape).

girl who ran out of the house in anger was gang-raped

अमरावती : अमरावती शहरात 25 वर्षीय युवतीवर  जणांकडून सामुहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन  पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात  आली आहे.  यामध्ये पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि कार जप्त करण्यात आहे.  सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  विलासनगर येथील एका युवतीचे घरी भांडण झाले त्यानंतर  युवती रागाच्या  भरात घराबाहेर पडली.  घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्याने जात असताना एका ओळखीच्या  युवकाने विलासनगरमधून युवतीला राग शांत करण्यासाठी नेलं आणि दारू पाजली.  त्यानंतर त्याने आपल्या चार मित्रांना बोलावले. त्यानंतर कारमध्ये आलेल्या तरुणांनी पीडिताला कारमध्ये बसवून अमरावती शहरातील वेलकम पॉईंटजवळील शेतात घेऊन गेले. तिथे तरुणांनी आळीपाळीने युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला बुधवारी पहाटे एका ठिकाणी सोडण्यात आले. 

तरुणांनी सोडल्यानंतर पीडिताने ताबडतोब पोलीस स्थानक गाठले.  आज दुपारी 1 च्या जवळपास पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. या प्रकरणी गाडगेनगर पोलीसांनी मनोज डोंगरे (वय 29) यांच्यासह अक्षय सरदार (वय 29), अजय लोखंडे (वय 28), मिलिंद दहाट (वय 30), प्रीतम धडसे (वय 19)  यांना अटक केली असून यांच्यावर गुन्हा दाखल केले असून त्यांच्याकडून चारचाकी गाडी जप्त केली आहे..

पीडितीन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ज्या बारमध्ये दारु घेतली त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये पीडित महिलेला एका व्यक्ती हात पकडून जबरदस्तीने घेऊन जाताना दिसली.  त्या फुटेजची बारकाईने चौकळी केली असता संशयीत व्यक्तीला विशालनगर येथून ताब्यात घेण्यात आले.

Web Title: girl who ran out of the house in anger was gang-raped

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here