Home अहमदनगर धक्कादायक! तीन नराधमांनी मुलीचे अफहरण करून अत्याचार

धक्कादायक! तीन नराधमांनी मुलीचे अफहरण करून अत्याचार

Ahmednagar Crime News: अपहरण करून अत्याचार (abused) करणाऱ्या तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुलीची सुटका करण्यात आली आहे. 

girl was kidnapped and abused by three arrested

अहमदनगर: नगर तालुक्यातील एका गावातून तीन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.

प्रियंका अशोक खडके (२४), सोमनाथ दत्तू धुळे (१९) व श्रावण संजय गायकवाड (१८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुक्यातील एका गावातून या आरोपींनी अल्पवयीनचे अपहरण केले होते. नगर तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने या गंभीर घटनेची दखल घेत आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची सूखरुप सुटका केली.

Web Title: girl was kidnapped and abused by three arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here